
महा पुणे लाईव्ह (प्रतिनिधी ) विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी फरारी व मोक्यातील पाहीजे असलेले आरोपी तसेच तडीपार आरोपी चेक करणे तसेच अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे व अंमलदार हे फरार व मोक्यातील पाहीजे असलेले आरोपी तसेच तडीपार आरोपी बाबत माहिती घेत दिघी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, पोलीस हवालदार प्रदीप पोटे व किरण जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम शिवकॉलनीच्या बाजूला रोडवर, आदर्शनगर, दिघी, पुणे येथे थांबलेले असून, त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून, छापा घातला. छाप्यामध्ये १) अर्जुनसिंग सुरजितसिंग भादा, वय २२ वर्षे, रा. शिवकॉलनी नं. ०४, आदर्शनगर, दिघी, पुणे २) सोहेल अलिशेर मिर्झा, वय २२ वर्षे, रा. वडारवस्ती, आळंदी ते पुणे रोड, राज वाईन्सचे पाठीमागे, विश्रांतवाडी, पुणे ३) रोमन दस्तगीर मुल्ला, वय २० वर्षे, रा. चौधरी पार्क गल्ली नं. ०९, मंगलमुर्ती रेसीडेन्सीजवळ, दिघी, पुणे हे मिळून आले. तसेच आंधाराचा फायदा घेवुन, त्यांचे ०३ साथीदार नामे १) बादशाहसिंग पोलादसिंग भोंड, रा. दिघी, पुणे २) आकाश सुधीर साळवी, रा. दिघी, पुणे ३) चेतन ऊर्फ चेप्या पांचाळ, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे हे पळून गेले. तद्नंतर पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी आकाश सुधीर साळवी वय- २२ वर्षे रा. प्रेमसुंदर निवास, सर्व्हे नं. ०२, गायकवाडनगर, दिधी, पुणे हा मिळून आला. पकडलेल्या आरोपीकडून ०२ लोखंडी कोयते, ०१ लोखंडी पालघन, एक लायटर पिस्टल, नायलॉन दोरी, मिर्ची पावडर पुडा, ०६ मोबाईल, दोन मोटार सायकल व एक स्कु ड्रायव्हर असा एकुण २,००,५००/- रू. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींकडे केलेल्या तपासमध्ये ते आळंदी ते मोशी रोडवरील पेट्रोल पंप, आळंदी, पुणे येथे दरोडा टाकण्या करीता एकत्र जमले असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांचे विरुध्द दिघी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४९३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (४), भारतीय हत्यार अधिनियम कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील अधिक तपास दिघी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपीवर दरोडा, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, दहशत माजविणे, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, घरफोडी, अंमली पदार्थ विक्री करणे व वाहनांची तोडफोड असे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. “आरोपी सोहेल मिर्झा व रोमन मुल्ला हे तडीपार असून, आरोपी अर्जुनसिंग भादा हा ०२ गुन्हयात आरोपी आहे. तसेच आरोपी आकाश साळवी हा ०१ गुन्हयात आरोपी आहे.”सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकाल महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, किरण काटकर, मंगेश जाधव, सुनिल कानगुडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोअंम, नागेश माळी व पोपट हुलगे यांचे पथकाने केली आहे.
